Ayushman Bharat Yojana 2023: आयुष्यमान भारत योजना नोंदणी सुरू, 5 लाख विमा

Ayushman Bharat Yojana 2023: देशातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी भारत सरकार वेळोवेळी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. देशातील गरीब आणि मागास कुटुंबीयांना आरोग्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने आयुष्यमान भारत योजनेला सुरुवात केली.

या योजनेअंतर्गत लाभर्थ्यांना विविध आजारांवर मात करण्यासाठी 5 लाखांचा विमा दिला जातो ज्यामध्ये किमान 1350 आजारांचा समावेश आहे.

आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात 2018 मध्ये छत्तीसगड राज्यातील विजापूर जिल्ह्यातून करण्यात आली होती आणि आता ही योजना संपूर्ण भारतात लागू केलेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे Ayushman Bharat Yojana प्रशासित केली जाते.

आयुष्यमान भारत योजना 2023

देशातील गरीब नागरिक जे आर्थिक अडचणींमुळे आपल्या आजारांवर उपचार घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ही योजना खूप उपयुक्त ठरत आहे. या योजनेत, लाभर्थ्याला वार्षिक पाच लाखांचा आरोग्य विमा प्रदान केला जातो. ज्यामुळे कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आजारपणाचा खर्च भागवता येईल.

नागरिकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शासनाकडून केले जात आहे.

किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना 2023: असा भरा ऑनलाईन फॉर्म

पीएम आयुष्यमान योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये

केंद्र सरकारने सुरू केलेल्या जन आरोग्य योजनेचे अनेक फायदे आहेत त्यापैकि काही खाली दिले आहेत.

 • प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेअंतर्गत सुमारे 10 कोटी कुटुंबीयांना त्याचा लाभ घेता येणार आहे.
 • या योजनेच्या माध्यमातून लाभर्थ्याला पाच लाखांचा आरोग्य विमा दिला जातो.
 • योजनेमार्फत औषधोपचार, वैद्यकीय सर्व खर्च शासनाकडून करण्यात येतो.
 • या योजनेत सुमारे 1350 आजारांचा समावेश करण्यात आला आहे.
 • कोणताही खर्च न करता सरकारकडून सर्व मदत या योजनेअंतर्गत केली जाते.

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना पात्रता कशी तपासायची?

 1. योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
 2. त्यानंतर वेबसाईट चे होमेपेज उघडेल ज्यावर ‘मी पात्र’ हा पर्याय दिसेल.
 3. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि OTP टाकावा लागेल.
 4. आता तुमचे यशस्वीरीत्या लॉगिन झाले आहे. येथून तुम्ही तुमची पात्रात तपासू शकता.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 1. आधार कार्ड
 2. रेशन कार्ड
 3. रहिवासी दाखला
 4. मोबाईल नंबर

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2023: पात्रता, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

योजनेसाठी नोंदणी कशी करावी?

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या.

 • सर्वप्रथम, अर्जदाराने जवळच्या जनसेवा केंद्रात जाऊन सर्व मूळ कागदपत्रांच्या छायाप्रत जमा कराव्यात.
 • त्यानंतर तेथील कर्मचार्‍यांद्वारे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. सर्व कागदपत्रे योग्य असल्यास तुमची नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला नोंदणी क्रमांक देण्यात येईल.
 • आयुष्यमान आरोग्य योजना नोंदणीच्या 10 ते 15 दिवसांनंतर तुम्हाला जनसेवा केंद्राकडून गोल्डन कार्ड मिळेल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल.

सारांश

तर मित्रांनो आजच्या लेखात आपण पीएम आयुष्यमान भारत योजना 2023 बद्दल माहिती जाणून घेतली. या योजनेबद्दल तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असल्यास आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.

शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट भेट देत रहा. तसेच, कृषि विषयक माहिती, व्यवसाय टिप्स बद्दल योग्य माहिती तुम्हाला येथे पाहायला मिळेल.

Leave a Comment