Crop Insurance: मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई, या दहा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार 15,000 रुपये

मार्च 2023 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बधितांना नुकसान भरपाई जाहीर 

अतिवृष्टी नुकसान भरपाई: मागील (मार्च) महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेल्या दहा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सरसकट 15,000 रुपयांची नुकसान भरपाई घोषित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन महसुल व वनविभागातर्फे दिनांक. 21 एप्रिल 2023 रोजी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

पात्र जिल्हयांची यादी आम्ही या लेखात दिली आहे तरी संपूर्ण लेख वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळू शकेल.

महत्वाचे मुद्दे

  • मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मुख्यत्वे: शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अवेळी पाऊस हा राज्य शासनाने घोषित केलेली केलेली आपत्ती असून पिकांचे नुकसान 33 टक्केपेक्षा जास्त असल्यास त्याबद्दल विहित दराने अनुदान स्वरुपात शेतकर्‍यांना मदत देण्यात येते.
  • या कालावधीत झालेल्या नुकसानीबाबत शेतकर्‍यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुत्त यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव दि. 8 मार्च 2023 च्या शासन पत्रान्वये मागविण्यात आले होते.
  • विभागीय आयुक्त अमरावती, नाशिक, पुणे व औरंगाबाद यांच्याकडून प्राप्त झालेल्या निधी मागणी प्रस्तावांनुसार दि. 10 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयामध्ये निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.
  • आता विभागीय आयुक्त कोंकण व नागपूर या जिल्ह्यांतून निधी मागणीचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यानुसार निधी वितरणास मान्यता देण्यात येईल.

शासन निर्णय

मार्च 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निच्छित केलेल्या दरानुसार शेतीपिके नुकसानीसाठी एकूण रु. 2718.52 (सत्तावीस कोटी अठरा लक्ष बावन्न हजार) इतका निधी जिल्हानिहाय वितरीत करण्यास शासनाची मंजूरी मिळाली आहे.

पात्र जिल्हयांची यादी

जिल्हा शेतकरी संख्या शेतीपिकांचे बाधित क्षेत्र एकूण निधी (लाखात)
नागपूर 5540 4441.60907.46
भंडारा 591128.1821.81
गोंदिया 457150.5025.40
चंद्रपुर958375.9554.31
गडचिरोली26321257.28178.05
ठाणे 1984530.27115.60
पालघर 254295286.581150.80
रायगड 38341180.85261.37
रत्नागिरी 00.000.00
सिंधुदुर्ग 5116.513.72

येत्या दोन आठवड्यांतच वरील यादीत नमूद लाभार्थी शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

पुढे वाचा

Leave a Comment