गाई म्हशी गोठा अनुदान योजना 2023: असा घ्या लाभ

गाई म्हशी गोठा अनुदान योजना 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपण गाई म्हशी गोठा अनुदान योजनेबद्दल सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत तुम्हाला रोख 80,000 रुपये मिळू शकतात.

राज्य सरकार शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबवत असते. शेकर्‍यांची जीवनशैली सुरळीत व्हावी आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी अनेक उपक्रम शासनातर्फे राबवले जातात.

शासनाने गाई म्हशी गोठा अनुदान योजना सुरू केली आहे ज्याद्वारे शेतकरी बांधवांना आर्थिक व स्समाजिक मदत केली जाणार आहे. पशुपालनाला चालना मिळावी या दृष्टीकोणातून ही योजना राबवण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरकारने केले आहे.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहे या संदर्भात सर्व उपयुक्त माहिती तुम्हाला या लेखात मिळणार आहे. त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.

गाय गोठा अनुदान योजनेची वैशिष्ट्ये

 • शेतकर्‍यांना आर्थिक व सामाजिक मदत करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
 • ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना स्वयंपूर्ण करण्याचे उद्दीष्ट समोर ठेऊन गाय गोठा अनुदान योजनेला सुरुवात करण्यात आली.
 • जनावरचे पाऊस, वारा तसेच ऊंनापासून संरक्षण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • यासाठी मिळणारी सर्व रक्कम थेट शेकर्‍यांच्या खात्यात जमा केली जाते.
 • शेकर्‍यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
 • योजनेसाठी अर्ज पद्धत प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवली आहे जेणेकरून शेतकर्‍यांचा खर्च आणि वेळ वाचेल.
 • गाय गोठा अनुदान योजना 2023 अंतर्गत शेतकर्‍यांना जास्तीत जास्त पशुपालन करण्यास प्रोत्साहन दिले जाते.

अटी व पात्रता

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी गाई म्हशी गोठा अनुदान योजना 2023 साठी पात्र आहेत. त्यामुळे जास्तीत शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • जातीचा दाखला
 • रहिवाशी प्रमाणपत्र
 • सहा गायी असल्याचा दाखला
 • बँक खाते पासबुक
 • विवाहित नमूण्यांचा अर्ज
 • जागेचा सातबारा उतारा

वरील कागदपत्रे तुमच्याकडे उपलब्ध असल्यास तुम्ही गाई म्हशी गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता.

अर्ज कसा आणि कुठे करावा?

1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागतो त्यासाठी लागणारा फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध होईल. (फॉर्म नमूना ऑनलाईन डाऊनलोड करायचा असल्यास आम्हाला कमेन्ट द्वारे कळवा)

2. फॉर्म भरल्यानंतर त्यावर सरपंचाची आणि ग्रामसेवकाची सही घेऊन तो अर्ज तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये सबमिट करू शकता.

3. तसे करायचे नसल्यास तुम्ही स्वत: सुद्धा हा फॉर्म अर्ज पंचायत समितीच्या ऑफिस मध्ये जावून जमा करू शकता.

4. सगळी कागदपत्रे बरोबर आणि विहित आढळल्यास तुमचा अर्ज जिल्हापरिषद कडे पाठवला जातो आणि तिथे तुमच्या अर्जाला मंजूरी दिली जाते.

5. अर्ज मंजूरी ची सूचना तुम्हाला तत्काल कळविण्यात येते. अशा प्रकारे ही अर्ज पद्धती आहे.

या योजना पाहिल्यात का?

> Namo Kisan Yojana: या शेतकर्‍यांना मिळणार दरवर्षी १२,००० रुपये

> PM Kisan Tractor Yojana 2023: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50% सबसिडी

सारांश

शेतकरी बांधवांनी ‘गाई म्हशी गोठा अनुदान योजना’ या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही टीम स्मार्ट उद्योजक द्वारे करतो.

शासनाच्या विविध योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही या वेबसाईट करत आहोत. तरी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक महितीसाठी तुम्ही आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करू शकता.

तुम्हाला शासनाची गाय गोठा अनुदान योजना 2023 कशी वाटली किंवा यामध्ये काही शंका असल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून विचारू शकता. ही माहिती तुमच्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून सर्वांना या योजनेचा लाभ घेता येईल.

Leave a Comment