Hydroponic Farming: मातीशिवाय शेती करण्याची आधुनिक पद्धत, जाणून घ्या!

Hydroponic farming in Marathi: काही दशकांपूर्वी कोणीही मातीशिवाय शेती करण्याचा विचारही करू शकत नव्हता. पण आज हायड्रोपोनिक शेतीमुळे हे शक्य झाले आहे. हायड्रोपोनिक तंत्रज्ञान हा शेतीसाठी एक अद्भुत शोध मानला जातो.

हायड्रोपोनिक शेतीसाठी माती किंवा जमीन लागत नाही. या तंत्रात पाण्याच्या साहाय्याने खते आणि पोषक द्रव्ये झाडांपर्यंत पोचवली जातात.

चला तर मग, स्मार्ट उद्योजकाच्या आजच्या या लेखात, हायड्रोपोनिक शेतीबद्दल सोप्या भाषेत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

हायड्रोपोनिक शेती म्हणजे काय?

हायड्रोपोनिक शेती हे आधुनिक तंत्र आहे. या तंत्राज्ञानाचा वापर करून हवामानावर नियंत्रण ठेवता येते आणि त्याद्वारे मातीशिवाय शेती करणे शक्य झाले आहे.

हायड्रोपोनिक शेतीमध्ये, वनस्पती फक्त पाण्यात यामध्ये वाढतात. त्यासाठी 15 ते 30 अंश सेंटीग्रेड तापमानाची गरज भासते. 80 ते 85% आर्द्रतेमध्ये Hydroponic Farming केली जाते.

अशा प्रकारे वनस्पतींना पोषक तत्वे दिली जातात

आपल्या सर्वांना माहितच आहे की मातीमध्ये वनस्पतींसाठी आवश्यक अनेक पोषक घटक उपलब्ध असतात. तर मग या तंत्रज्ञानामध्ये जर मातीचा उपयोगच होत नसेल तर झाडांना लागणारी आवश्यक पोषक तत्वे कशी मिळणार?

तर आम्ही तुम्हाला सांगतो, हायड्रोपोनिक पद्धतीमध्ये फॉस्फरस, नायट्रोजन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅश, झिंक, सल्फर, लोह इत्यादी पोषक आणि खनिजे यांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून द्रावण तयार केले जाते. हे द्रावण ठराविक वेळेच्या अंतराने पाण्यात मिसळले जाते. त्यामुळे झाडांना सर्व पोषक द्रव्ये मिळतात.

Protected Agriculture: उच्च दर्जाच्या पिकापासून उत्पन्न दुप्पट होईल, संरक्षित लागवडीचे फायदे जाणून घ्या

हायड्रोपोनिक शेती कशी केली जाते?

हायड्रोपोनिक शेतीमध्ये पाईप वापरून झाडे वाढवली जातात. पाईपमध्ये अनेक छिद्रे करून त्यामध्ये झाडे लावली जातात. पाईपच्या मदतीने पोषक तत्वे वनस्पतींच्या मुळापर्यंत पोहचवली जातात.

या तंत्रज्ञानाचा वापर मुख्यत: लहान वनस्पती पिकांची लागवड करण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये गाजर, सलगम, काकडी, मुळा, बटाटा, शिमला मिरची, मटार, मिरची, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, टरबूज, खरबूज, अननस, सेलेरी, तुळस इ. वनस्पतींचा समावेश आहे.

हायड्रोपोनिक शेतीसाठी येणारा खर्च

हायड्रोपोनिक यंत्रणा उभारण्यासाठी प्रारंभिक खर्च जास्त आहे. या पद्धतीमुळे कमी जागेत जास्त झाडे लावता येतात. त्यामुळे काही काळानंतर यामध्ये अधिक नफा मिळतो. यासाठी आपण प्रति एकर क्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानाची स्थापना करण्याबद्दल बोललो तर पाच लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

जर तुम्हाला ते छोट्या प्रमाणावर सुरू करायचे असेल तर तुम्ही 100 स्क्वेअर फूट क्षेत्रातही ते उभारू शकता. याची किंमत 50,000 ते 60,000 रुपये असू शकते. 100 चौरस फुटात सुमारे 200 झाडे लावता येतात.

हायड्रोपोनिक शेतीचे फायदे

  • हायड्रोपोनिक पद्धतीने शेती केल्यास ९० टक्के पाण्याची बचत होऊ शकते.
  • हायड्रोपोनिक शेती पारंपारिक शेतीपेक्षा कमी जागेत जास्त रोपे वाढवता येते.
  • पोषक द्रव्ये वाया जात नाहीत आणि त्यामुळे चांगल्या प्रतीचे पीक घेता येते.
  • या तंत्रात, वनस्पतींवर हवामान, प्राणी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या बाह्य, जैविक आणि अजैविक घटकांचा परिणाम होत नाही.

तर अशा प्रकारे शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञांनांचा वापर करून तुम्ही चांगले उत्पन्न घेऊ शकता. परिणामी यातून तुम्हाला चांगला नफाही होईल.

तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहचवा. कृषि, बाजार भाव, व्यवसाय संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा.

Leave a Comment