किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना 2023: असा भरा ऑनलाईन फॉर्म

किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना : केंद्र सरकार वेळोवेळी देशातील शेतकर्‍यांना शेतीमध्ये प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने अनेक कल्याण योजना सुरू करते आणि त्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करते.

अशाच एका विशेष योजनेच्या माध्यमातून, राज्यातील शेतकरी बांधवांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेला सुरुवात केली.

या योजनेच्या माध्यमातून, राज्यातील शेतकरी कोणत्याही आर्थिक अडचणींमध्ये न सापडता सहजपणे कर्ज मिळवण्यास सक्षम असतील, ज्यासाठी त्यांना या योजनेअंतर्गत विविध बँकांकडून 3 लाख रुपये कर्ज मिळू शकेल.

किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे, किसान क्रेडिट कार्ड साठी लागणारी कागदपत्रे तसेच किसान क्रेडिट कार्ड महाराष्ट्र यादी, किसान कर्ज योजना संबंधित सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.

पीएम किसान क्रेडिट कार्ड योजना

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत, देशातील छोट्या आणि मध्यमवर्गीय शेतकर्‍यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी किंवा कृषि कार्यासाठी कर्ज देण्यासाठी सरकार या योजनेच्या माध्यमातून शेकार्‍यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देते.

या क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून शेतकर्‍यांना कोणतीही हमी न देता 1.60 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते ज्यासाठी अगदी कमी व्याज दर आकारला जातो. यासह, शेतकरी KCC फर्मिंगशी संबंधित वस्तू देखील खरेदी करू शकतात.

पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत आता शेतकरी पशुपालन, मत्स्यव्यवसाय साठी लागणारे कर्ज लाभ सहपणे घेऊ शकतील.

किसान क्रेडिट कार्ड योजना फायदे आणि वैशिष्ट्ये

 • KCC योजनेद्वारे कमी व्याज दरात शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
 • KCC योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
 • पंतप्रधान योजनेअंतर्गत अर्जदारास 7% व्याज दरावर 1 लाख 60 हजारपर्यंत कर्ज देण्यात येते.
 • केसीसी योजनेमध्ये वयाच्या 70 वर्षांपर्यंत विमा प्रदान केला जातो.
 • योजनेच्या माध्यमातून देशातील एक करोड शेतकरी बांधवांना लाभ प्राप्त होईल.
 • किसान क्रेडिट कार्ड योजनेमुळे शेकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्याचा व्यवसाय वाढवण्यास मदत होईल.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2023: पात्रता, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

अटी आणि पात्रता

किसान कार्ड कर्ज योजना 2023 लाभ घेण्यासाठी अर्जदारास त्याची विहित पात्रता पूर्ण करावी लागेल. त्यासंबंधित सर्व माहिती पुढीलप्रमाणे आहे.

 1. पीएम किसान कार्ड योजनेसाठी भारत देशातील सर्व शेतकरी पात्र आहेत.
 2. योजनेचा लाभ घेणार्‍या उमेदवारांचे वय 18 ते 75 वर्षाच्या दरम्यान असावे.
 3. ज्या शेतकर्‍यांना एक लाखापेक्षा अधिक कर्ज घ्यायचे आहे त्यांना त्यांची जमीन गहाण ठेवावी लागेल. स्वत:ची जमीन नसलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
 4. KCC योजनेअंतर्गत 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या अर्जदारांना सोबत साक्षीदार असणे आवश्यक आहे.

KCC आवश्यक कागदपत्रे

 • उमेदवाराचे आधार कार्ड
 • ओळखपत्र (मतदान कार्ड, पॅन कार्ड)
 • पासपोर्ट साईज फोटो
 • बँक खाते पासबुक
 • इतर आवश्यक कागदपत्रे

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 4.0: असा करा ऑनलाईन अर्ज

किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना अर्ज प्रक्रिया

किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीचा वापर करू शकता. या लेखात ऑनलाईन अर्ज पद्धतीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 1. KCC ऑनलाईन अर्जासाठी प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
 2. आता तुमच्या स्क्रीनवर मुख्य पृष्ठ उघडेल.
 3. येथे तुम्हाला कृषि आणि ग्रामीण या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर, तुम्हाला अर्जाचा पर्याय दिसेल.
 4. अर्ज भरण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि ओके पर्यायावर क्लिक करा.
 5. फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला अचूक भरणे आवश्यक आहे.
 6. सर्व माहिती भरून फॉर्म सबमीट केल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल.

अशा प्रकारे तुम्ही किसान क्रेडिट कार्ड 2023 साठी ऑनलाईन अर्ज भरू शकता.

सारांश

किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळाली असेल अशी आम्ही आशा करतो. यासंबंधित तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता.

देशातील शेतकरी बांधवांसाठी अशीच उपयुक्त माहिती आम्ही स्मार्ट उद्योजक वेबसाईट द्वारे नेहमी प्रदान करत असतो. ही माहिती तुमच्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Leave a Comment