Kissan GPT: शेतकर्‍यांसाठी मोठे वरदान, चॅट जीपीटी च्या स्पर्धेत आता किसान जीपीटी

Kissan GPT in Marathi: सध्या चॅट जीपीटी (Chat GPT) नावाचं AI तंत्रज्ञान खूपचं लोकप्रिय होताना दिसत आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्राला या तंत्रज्ञानाने जोडण्याचे काम चालू आहे. याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकर्‍यांच्या समस्याही दूर करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

या तंत्रज्ञानाचाच एक भाग म्हणून नुकताच किसान जीपीटी (Kissan GPT) नावाचा AI चॅटबॉट विकसित करण्यात आला आहे. शेती आणि शेतकर्‍यांसाठी हा चॅटबॉट गेम चेंजर ठरू शकतो असे कृषी क्षेत्रात काम करणार्‍या लोकांचे म्हणणे आहे.

चला तर मग Kissan GPT in Marathi बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

चॅट जीपीटी आणि किसान जीपीटी फरक

What is Kissan GPT? – किसान जीपीटी बद्दल जाणून घेण्याआधी आपण Chat GPT काय आहे ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

शेतकरी मित्रांनो, चॅट जीपीटी हे एक असं तंत्रज्ञान आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे अगदी सहज शोधू शकतो. हे तंत्रज्ञान गूगल सर्च इंजिन सारखं काम करतं तरी त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) रिसर्च फर्म ने विकसित केलेला हा चॅटबॉट केवळ प्रश्नांची उत्तरे देत नाही तर माणसाप्रमाणे संवादही साधू शकतो. तुम्ही विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर चॅट जीपीटी अगदी मुद्देसूद पद्धतीने कृत्रिम बुद्धीमतेचा वापर करून देतो. त्यामुळे जगभरात याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे.

आता किसान जीपीटी Kissan GPT in Marathi नेमका काय आहे ते जाणून घेऊ.

किसान जीपीटी म्हणजे काय?

AI आधारित किसान जीपीटी हा चॅटबॉट प्रतीक देसाई यांनी विकसित केला आहे. प्रतीक देसाई हे संगणक शास्त्रज्ञ असून ते अमेरिकेत कार्यरत आहेत. Kisaan GPT information in Marathi बनवण्याचा मुख्य: उद्देश शेतकरी आणि कृषी तज्ञांमधील अंतर कमी करणे हा आहे असं ते सांगतात. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या समस्येच तात्काळ उत्तर मिळेल.

शेतकर्‍यांच्या पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य माहिती आणि संवसाधने योग्य वेळेस उपलब्ध होण्यास याने मदत होईल. कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणणारे तंत्रज्ञान म्हणून सध्या किसान जीपीटी Kissan GPT Marathi चे वर्णन केले जात आहे.

या तंत्रज्ञानामुळे शेतकर्‍यांना शेती क्षेत्रातील माहिती मिळवण्यासाठी कोणत्याही माणसावर अवलंबून राहावे लागणार नाही. शेतकरी बांधव स्वत: च आपली समस्या किसान जीपीटी ला त्यांच्या भाषेत विचारू शकतील.

किसान जीपीटी चॅटबॉट च्या सहाय्याने शेतकरी त्यांना शेती क्षेत्रात येणार्‍या अडचणी काय आहेत आणि ती परिस्थिति कशी टाळता येईल हे जाणून घेऊ शकतील. कृषी सल्ल्याद्वारे पीक उत्पादन वाढवू शकतील.

हवामानाशी संबंधित प्रश्न असो अथवा किड रोग व्यवस्थापनाविषयी समस्या असो Kissan GPT in Marathi च्या माध्यमातून शेतकर्‍यांना कृषी क्षेत्रातील सर्व प्रश्नांची उत्तरे सहज मिळतील. म्हणूनच येत्या काळात शेती क्षेत्रातील सर्व आव्हानांना तोंड देण्यास किसान जीपीटी उपयुक्त असल्याचं सांगितलं जात आहे.

विविध भाषांचा समावेश

भारतात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात ही बाब ध्यानात घेत किसान जीपीटी सध्या 9 भारतीय भाषांमध्ये शेतकर्‍यांशी संवाद साधू शकते. त्यामध्ये प्रामुख्याने हिंदी, मराठी, गुजराती, बंगालीसह इतर भाषांचा समावेश आहे.

त्याचबरोबर किसान जीपीटी इंग्लिश, पोर्तुगीज, जापणीस, स्पॅनिश आणि इंडोनेशियन भाषेत देखील शेतकर्‍यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देऊ शकते.

Kisaan GPT चा कृषी क्षेत्रातील वाढता वापर ध्यानात घेत यामध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. यामुळे शेतकर्‍यांना आणखी सोप्या पद्धतीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास येत्या काळात मदत होणार आहे.

पुढे काय होणार?

प्रतीक देसाई यांनी 31 मार्च रोजी किसान GPT वर एक अपडेट दिले असून ते म्हणाले की AI चॅटबॉट सध्या शेतकरी कॉल सेंटरच्या 10 टक्के व्हॉल्यूमची सेवा देण्याच्या मार्गावर आहे.

ते पुढे म्हणाले की हे व्यासपीठ परिणाम सुधारण्यासाठी भारत सरकार आणि कृषी संस्थांसोबत सहकार्य करण्यास उत्सुक आहे.

तर शेतकरी बांधवानो, तुमचे किसान जीपीटी बद्दल काय मत आहे? तुम्हाला याचा वापर करायला आवडेल का? हे सर्व आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा.

पुढे वाचा:

Leave a Comment