Lek Ladki Yojana: महाराष्ट्राची नवीन ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत मिळणार 98,000 रुपये

Lek Ladki Yojana: मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्वत:च्या पायावर उभे राहता यावे तसेच आपल्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार प्राप्त व्हावा याकरिता महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजना पुन्हा आरंभित केली केलेली आहे.

या योजनेअंतर्गत ज्या पालकांना मुली आहेत त्यांना आपल्या मुलीच्या नावाने सरकारकडून आर्थिक मदद केली जाणार आहे. जेणेकरून मुलींना आपल्या शिक्षणाचा, दैनंदिन जीवनातील पालनपोषणाचा उदरनिर्वाहासाठी लागणारा खर्च स्वत: करता येईल. आपल्या खर्चावर कोणावर अवलंबून राहता येणार नाही.

लेक लाडकी योजनेबद्दल संपूर्ण माहिती, पात्रता आणि निकष, अटी तसेच अर्ज कुठे भरावा याची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.

आर्थिक लाभाचे वर्गीकरण

 1. मुलीच्या जन्मानंतर – 5000
 2. पहिलीत असताना – 4000
 3. सहावीत असताना – 6000
 4. अकरावीला असताना – 8000
 5. अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर – 75,000

या प्रकारे एकूण चार टप्प्यात 98 हजार रुपये इतकी रक्कम या योजनेअंतर्गत मुलींना आर्थिक सहाय्य म्हणून दिली जाते. मिळणारी सर्व रक्कम थेट मुलीच्या बँक खात्यात पाठविले जाते.

अटी व पात्रता

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून फक्त दोनचं महत्वाच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत त्या खालीलप्रमाणे:

 1. योजनेचा लाभ घेणारी मुलगी ही महाराष्ट्र राज्यातील मुळ रहिवासी असावी. तिचा जन्म महाराष्ट्र राज्यातील असावा.
 2. कुटुंबियांकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असायला हवे. (पांढर्‍या रेशनकार्ड असलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येत नाही)
पहा >> महाराष्ट्र रोजगार भत्ता योजनेअंतर्गत प्रतिमहिना मिळणार 5000 रुपये

       Namo Kisan Yojana: या शेतकर्‍यांना मिळणार दरवर्षी १२,००० रुपये

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • मुलीचे आधार कार्ड
 • मुलीचे किंवा तिच्या आईवडिलांचे बँक खाते पासबुक
 • उत्पन्न प्रमाणपत्र
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • कुटुंबाचे केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड
 • मुलीचे दोन पासपोर्ट साईज फोटो
 • पालकांचा संपर्क/मोबाईल नंबर

वरील कागदपत्रे तुमच्याकडे असल्यास तुम्ही ‘लेक लाडकी’ योजनेसाठी अर्ज करू शकता.

अर्ज कसा आणि कुठे करावा?

लेक लाडकी ही योजना सध्या महाराष्ट्र शासनाने मार्च 2023 अखेर मुलींसाठी नवीनच घोषित केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी अजून कोणतीही अधिकृत वेबसाईट/संकेतस्थळ शासनाने जाहीर केले नाही.

लवकरच यासाठी शासनामार्फत परिपत्रक (GR) काढले जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येईल.

जे पालक आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत त्यांच्या मुलींसाठी शासनाची ही योजना वरदान असणार आहे त्यामुळे ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहचवा.

शासनाकडून GR काढले जाईल तेव्हा आम्ही लवकरच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहचवू. अश्या अनेक योजनसंबंधित महितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉइन करा.

शासनाची Lek Ladki Yojana तुम्हाला कशी वाटली किंवा या योजनेबद्दल इतर कोणतीही शंका असल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून कळवा.

Leave a Comment