महाराष्ट्र रोजगार भत्ता योजनेअंतर्गत प्रतिमहिना मिळणार 5000 रुपये

Maharashtra Berojgar Bhatta Yojana 2023: महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवकांसाठी विविध सरकारी योजना शासनाद्वारे दरवर्षी राबवल्या जातात. राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी शासनाने ‘महाराष्ट्र रोजगार भत्ता योजना‘ या योजनेला सुरुवात केली आहे.

राज्यातील बहुतांश परिवार हे आजही गरिबी रेषेखाली स्वत:चे जीवन जगत आहेत. सुशिक्षित युवकांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकर्‍या उपलब्ध नसल्या कारणाने ते बेरोजगार आहेत. अशा परिस्थितीमध्ये इच्छा असून सुद्धा आर्थिक अडचणीमुळे स्वत:चा एखादा उद्योग सुरू करू शकत नाहीत.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित युवकांना दरमहा 5000 रुपये बेरोजगार भत्ता आर्थिक मदद शासनातर्फे दिली जाते.

महाराष्ट्र बेरोजगार भत्ता फॉर्म online कसा भरावा, नाव नोंदणी कशी करावी तसेच त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत याची सर्व माहिती या लेखात दिली आहे.

महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेची उद्दिष्ट्ये

 • महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आर्थिक मदद मिळावी यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.
 • दरमहा बेरोजगार तरुणांना 5000 रुपयांची आर्थिक मदद केली जाते.
 • योजनेअंतर्गत जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत या योजनेचा लाभ घेता येतो.
 • राज्यातील बेरोजगार युवकांना आर्थिक मदद करणे, त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेमागचा मुख्य हेतु आहे.
 • बेरोजगार भत्ता योजनेतून मिळणारी रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते.
 • महाराष्ट्र रोजगार भत्ता योजनेच्या मदतीने बेरोजगार युवक दैनंदिन होणारा खर्च पूर्ण करू शकतात.
 • Maharashtra Berojgari Bhatta योजने अंतर्गत मिळणार्‍या पैशाच्या सहाय्याने युवकांस नवीन नोकरीसाठी प्रवास खर्च तसेच अर्ज भरण्यासाठी मदद होईल.
Namo Kisan Yojana: या शेतकर्‍यांना मिळणार दरवर्षी १२,००० रुपये

अटी व पात्रता 

 1. Maharashtra Berojgar Bhatta Yojana फक्त महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी आहे.
 2. जे तरुण सुशिक्षित, बेरोजगार (उत्पनाचे इतर कोणतेही साधन नाही) आहेत तेच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
 3. अर्जदार कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि यासाठी 21 ते 35 वर्षांची वयोमार्यादा दिली आहे.
 4. वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी असलेले अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरतील.
 5. तुमचे नाव एम्प्लॉयमेंट ऑफिस मध्ये रजिस्टर असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधारकार्ड
 • मतदान ओळखपत्र
 • पॅन कार्ड
 • रहिवासी दाखला
 • जन्म प्रमाणपत्र
 • शाळा सोडल्याचा दाखला (किमान १२ वी उत्तीर्ण)
 • कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
 • बँक पासबुक आणि मोबाईल नंबर
 • पासपोर्ट साईज फोटो, ई-मेल

महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

 1. सर्वप्रथम अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर लॉगिन करावे लागेल.
 2. वेबसाईटच्या होम पेज वर तुम्हाला ‘नोकरीच्छूक उमेदवार लॉग-इन’ पर्याय दिसेल तिथून तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
 3. आता तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. जसे की नाव, मोबाइल नंबर, जन्मतारीख, आधार क्रमांक इत्यादि.
 4. या पेज वरची सर्व माहिती भरून झाल्यावर Next वर क्लिक करावे लागेल ज्यानंतर तुम्हाला दिलेल्या नंबर वर OTP येईल.
 5. आता हा OTP टाकून तुम्ही तुमचा महाराष्ट्र बेरोजगार भत्ता फॉर्म online सबमिट करू शकता.
 6. अशा प्रकारे तुमची रजिस्ट्रेशन/नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्ही सहजपणे अर्ज भरू शकता.

Maharashtra Berojgar Bhatta Yojana महाराष्ट्र रोजगार भत्ता योजनेचा लाभ जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. तुम्हाला यामध्ये काही शंका असल्यास आम्हाला कमेन्ट द्वारे कळवू शकता.

Leave a Comment