शेवगा पानांच्या पावडर पासून लाखोंची कमाई: परदेशात मोठी मागणी, किलोला मिळतोय हजारो रुपये दर

Moringa Leaves Powder: नमस्कार शेतकरी बांधवानो, तुम्हाला माहीत आहे का शेवगा पावडरच्या उत्पादनातून तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून लाखो रुपयांची कमाई करू शकता. होय… आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून! कारण शेवगा पानांच्या पावडरीतील पौष्टिक गुणधर्मांमुळे जागतिक बाजारपेठेत तिची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.

हीच बाब ध्यानात घेत केंद्र सरकारने 29 डिसेंबर 2020 पासून सरकारी पातळीवर शेवगा पानांच्या पावडरीची निर्यात सुरू केली आहे. सरकारी पातळीवर याची दखल अलीकडे घेतली गेली असली तरी शेवगा पानांच्या पावडरीची निर्यात मागील दोन दशकांपासून सुरू असल्याचे दिसून येत.

शेवगा पावडर निर्यात

शेवगा पावडरीच्या निर्यातीसाठी तेलंगणा येतील एक अपेडा नोंदनिकृत निर्यातदार मेसस मेडिकोंडा न्यूट्रियंट्स यांना नियोजनबद्ध मार्गाने निर्यात करण्यासाठी पाठिंबा देण्यात आला आहे. कंपनीने त्यांच्या मालकीच्या जागेवरील 240 हेक्टर क्षेत्रावर शेवग्याची झाडे लावली आहेत.

या ठिकाणी कंपनीने कंत्राटी स्वरुपात प्रमाणित सेंद्रिय पद्धतीने शेवग्याचे उत्पादन सुरू केले आहे. कंपनीने 40 मेट्रिक टन शेवग्याच्या पानांची पावडर अमेरिकेत प्रस्तावित करण्याचा आराखडाही तयार केला आहे.

मिळालेल्या डेटा नुसार भारतातून या पावडरीची 3700 शिपमेंट निर्यात करण्यात आली आहे. भारतातील एकूण 295 निर्यातदारांनी 1124 खरेदीदारांना निर्यात केली आहे. शेवगा पानांच्या पावडरीची ही निर्यात यूनायटेड स्टेट्स, कॅनडा, जर्मनी, यूके, साऊथ कोरिया यासारख्या विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जातेय.

जागतिक बाजारपेठेतील शेवगा पानांच्या पावडरीची वाढती मागणी ध्यानात घेत मेसस मेडिकोंडा न्यूट्रियंट्स कंपनीने तेलंगणातील पुलकल मोंडण संघारेड्डी जिल्ह्यातील गोंगलूर गावात शेवग्याच्या पानांवर प्रक्रिया करून उत्पादन करणारे केंद्र सुरू केले आहे.

या माध्यमातून भारतातून शेवग्याच्या पावडरची निर्यात वाढवण्यासाठी आणि इच्छुक निर्यातीदारांसाठी अपेडा सतत सुलभीकरण करत आहे. भारतात अपेड्याच्या पाठिंब्याने अधिकाधिक शेवगा प्रक्रिया केंद्रे उभारली जात आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात निर्यातीत वाढ होऊन त्याचा भारतातील शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार आहे.

Medicinal Plants Cultivation: या आहेत 10 औषधी वनस्पती ज्यांची लागवड तुम्हाला श्रीमंत बनवू शकते

शेवगा अनेक शतकांपासून त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे आणि आरोग्यदायी लाभांमुळे आहारात वापरला जातो. शेवग्यामुळे लहान मुलांच्या हाडांची वाढ योग्य प्रमाणात होण्यास मदत होते.

पानांपासून बनवलेली पावडर हृदयविकार, मधुमेह यांसारख्या आजारांवर गुणकारी आहे. तसेच शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्याने आहारामध्ये शेवग्याचा वापर केल्यास शरीरास नैसर्गिकरीत्या कॅल्शियम मिळते.

वेगवेगळ्या कंपन्यांच्या ब्रँडनुसार शेवगा पानांच्या पावडरीची जागतिक बाजारपेठेत एक किलोची किंमत सुमारे 30 डॉलर्स पासून 90 डॉलर्स च्या आसपास आहे. अर्थात भारतीय चलनात याचा विचार केल्यास ही किंमत 2500 रुपयांपासून 7500 हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे आपल्या शेतकर्‍यांना शेवगा पानांच्या पावडरीच्या निर्यातीतून चांगली आर्थिक कमाई करता येणे शक्य आहे.

Leave a Comment