आनंदाची बातमी: नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला 2000 रूपयांचा हप्ता जाहीर, अशी पहा यादी

नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केला जाणार असून त्यासंबंधित लाभार्थी यादी जाहीर 

Namo Kisan Yojana Beneficiary List: शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे नमो किसान योजनेचा 2000 रूपयांचा पहिला हप्ता लवकरच लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.

राज्यभरातील अनेक शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला होता त्यासंबंधित लाभार्थी शेतकर्‍यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

तर हा पहिला हप्ता कोणत्या शेतकर्‍यांना मिळणार, लाभर्थ्यांची यादी कशी पाहावी याबद्दल सविस्तर माहिती आम्ही येथे दिली आहे. त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा आणि आपले नाव या यादीत आहे का ते तपासा.

नमो किसान सन्मान योजना 2023

महाराष्ट्र सरकारने आपल्या नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रातील १.५ कोटी शेतकऱ्यांना थेट नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेद्वारे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून 6,000 रुपयांच्या मदतीव्यतिरिक्त आर्थिक मदत म्हणून अधिक 6,000 रुपये राज्यातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.

अशा प्रकारे मनो शेतकरी महासन्मान योजनेचा 6900 कोटी रुपये राज्य सरकार उचलणार आहे. यासाठी राज्यभरातून लाखो शेतकरी बांधवांनी अर्ज केले होते.

पहिला हप्ता यादी जाहीर

शासनाने Namo Kisan Yojana पहिला हप्ता लाभार्थी यादी अधिकृत पोर्टल वर उपलब्ध केली आहे. तर ही यादी तुम्ही आपल्या मोबाईल वर अगदी सहजरीत्या पाहू किंवा डाऊनलोड करू शकता.

जर तुम्हाला तुमच्या गावाची यादी मोबाईल वर डाऊनलोड करायची असेल किंवा ऑनलाईन पाहायची असेल त्यासाठी आम्ही स्टेप बाय स्टेप पद्धतीने माहिती खाली दिली आहे.

आपले नाव यादीत कसे तपासावे?

  • सर्वप्रथम, तुम्हाला PM Kisan योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे कारण नमो किसान योजना ही पीएम किसान योजनेच्या धरतीवर राज्यशासनाने चालू केली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत सर्व माहिती तुम्हाला याच पोर्टल वर मिळेल.
  • वेबसाईट च्या मुख्य पृष्ठावर तुम्हाला ‘फार्मर्स कॉर्नर’ Farmers Corner नावाचं पर्याय दिसेल.
  • Farmers Corner च्या टॅब मध्येच तुम्हाला लाभार्थी यादी हा पर्याय दिसेल.
  • या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गाव निवडण्याचे सवलत मिळते.
  • आता Get Data पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुमच्या गावाची नमो किसान योजना लाभार्थी यादी दिसेल. ही यादी तुम्ही डाऊनलोड करून प्रिंट आऊट काढू शकता.

या यादीत नाव असलेल्या शेतकर्‍यांनाच नमो किसान योजनेचा पहिला हप्ता प्राप्त होणार आहे. जर तुमचे नाव या यादीत समाविष्ट असेल तर योजनेचा पहिला हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा केला जाईल.

शेतकरी बांधवानो, शासनाच्या विविध योजना, शेती आणि व्यवसाय संबधित माहिती डायरेक्ट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आमचा स्मार्ट उद्योजक ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

अधिक वाचा:

Leave a Comment