Namo Kisan Yojana: या शेतकर्‍यांना मिळणार दरवर्षी १२,००० रुपये

Namo Kisan Yojana 2023: महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी PM किसान योजनेप्रमाणेच वर्षाला ६००० रुपये देण्यासाठी राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना‘ ही नवी योजना जाहीर केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान Namo Kisan Yojana बद्दल अधिक माहिती दिली.

या योजनेअंतर्गत तब्बल ६९०० कोटी रूपयांचा भार राज्य सरकार उचलणार असून १.१५ कोटी शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे.

तर नेमकी Namo Kisan Yojana ही योजना काय आहे आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र, काही अटी यांबद्दल संपूर्ण माहिती आम्ही या लेखात दिली आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे?

जसे की तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल माहीतच आहे. केंद्र सरकार देशभरात ही योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत दर 4 महिन्यांनंतर शेतकरी कुटुंबाला 2000 रूपयांचा हप्ता म्हणजेच वार्षिक 6000 रुपये इतकी आर्थिक मदद केली जाते.

आता याच योजनेला आणखी भर देण्यासाठी राज्य सरकारने या योजनेमध्ये Namo Kisan Yojana अंतर्गत आणखी 6000 रुपयांची भर घातली आहे.

त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांना केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे एकूण १२,००० रुपयांची मदद दरवर्षी मिळणार आहे. ही योजना अशी आहे.

कोणाला मिळेल लाभ?

 • १ फेब्रुवारी २०१९ पासून ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे असे शेतकरी
 • बँक खात्याला आधार लिंक केलेले शेतकरी
 • प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ई-केवायसी केलेले पात्र शेतकरी
 • लाभार्थीच्या नावावरील सर्व मालमत्तेची माहिती दिलेले शेतकरी

ही कागदपत्रे तयार ठेवा

 1. पासपोर्ट साइज २ फोटो
 2. आधारकार्ड
 3. रहिवाशी पुरावा
 4. उत्पन्नाचा दाखला
 5. जात प्रमाणपत्र
 6. सातबारा व ८ अ दाखला
 7. रेशन कार्ड
 8. बँक पासबुक आणि मोबाईल नंबर

अटी व पात्रता | Namo Kisan Yojana

 • अर्ज करणारा शेतकरी हा मूळचा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. (राज्य बाहेरील लोक जरी जमीन घेऊन महाराष्ट्रात राहत असतील ते या योजनेसाठी पात्र नाहीत)
 • अर्ज करणार्‍या शेतकर्‍याकडे थोडीफार शेती असावी.
 • नोंदणी करण्यासाठी जोडल्या गेलेल्या बँक खात्याला आधार लिंक असावे.
 • आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा.
 • शेतकरी अल्पभूधारक असावा – शेतकर्‍याकडे जास्तीत जास्त अडीच एकर जमीन असावी. त्यापेक्षा जास्त जमीन असल्यास ते शेतकरी या योजनेस पात्र ठरणार नाहीत.
 • शेतकरी PM किसान योजनेचा लाभार्थी असावा – या अटीमध्ये GR निघाल्यानंतर इतर बदल होऊ शकतात.
या योजना पाहिल्यात का?

> PM Kisan Tractor Yojana 2023: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50% सबसिडी

> महाराष्ट्र रोजगार भत्ता योजनेअंतर्गत प्रतिमहिना मिळणार 5000 रुपये

जर तुम्हाला Namo Kisan Yojana 2023 या योजनेबद्दल अजूनही काही शंका असल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून विचारू शकता. तसेच, शासनाच्या नवनवीन योजना, उद्योग संबंधित अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp Group नक्की जॉईन करा.

Leave a Comment