PM Kisan Tractor Yojana 2023: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50% सबसिडी

PM Kisan Tractor Yojana 2023: आपणा सर्वांना माहित आहे की सरकार आपल्या देशातील शेतकर्‍यांना लाभ देण्यासाठी अनेक योजना राबवते. या योजनांद्वारे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढून त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

आज आम्ही या लेखात तुम्हाला प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना बद्दल माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख पूर्ण वाचा आणि या योजनेसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घ्या.

सरकार किसान ट्रॅक्टर योजनेतून शेतकर्‍यांना अनुदान देते. ज्या शेतकर्‍यांना शेतीसाठी स्वत: चा ट्रॅक्टर घ्यायचा आहे, त्यांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत 20 ते 50% अनुदान दिले जाते. यामुळे शेतकरी बांधवांना शेतीच्या कामात मदद होणार असून त्यांना चांगले उत्पादन मिळेल.

तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करून सबसिडी मिळवू शकता. त्यासंबंधित सर्व माहिती या लेखात दिली आहे.

अटी व पात्रता

PM Kisan Tractor Yojana 2023 योजनेसाठी काही अटी सुद्धा आहेत आणि फक्त पात्र अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी अर्जदारांनी प्रथम पात्रता व निकष तपासणे गरजेचे आहे. यासाठी खाली दिलेल्या अटी जाणून घ्या.

 • प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजनेअंतर्गत लाभार्थी फक्त एक ट्रॅक्टर विकत घेऊ शकतो.
 • या योजनेसाठी अर्ज करणार नागरिक हा भारताचा कायमचा नागरिक असणे आवश्यक आहे.
 • वयोमार्यादा 18 ते 60 वर्षे
 • योजनेसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखांपेक्षा कमी असावे.
 • ज्या अर्जदारांनी योजनेसाठी अर्ज केला आहे त्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे.

ट्रॅक्टर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 1. पासपोर्ट साइज फोटो
 2. आधार कार्ड
 3. रहिवासी दाखला
 4. उत्पन्न प्रमाणपत्र
 5. जमिनीशी संबंधित कागदपत्रे
 6. बँक खाते पासबुक
 7. मोबाईल नंबर

अर्ज कसा आणि कुठे करावा?

 • तुम्हाला ट्रॅक्टर योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आधी तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल.
 • त्यानंतर तेथून तुम्हाला प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा तेथे तुमची कागदपत्रे जमा करून तुम्ही फॉर्म भरू शकता.
 • त्यानंतर तुमचा फॉर्म केंद्राच्या कर्मचार्‍याद्वारे भरण्यात येईल ज्यासाठी तुम्हाला काही माहिती विचारली जाईल.
 • सर्व माहिती योग्य असल्यास त्यानंतर तुमची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केली जातील.
 • फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला त्याची पावती दिली जाईल ज्यावर तुमचा फॉर्म क्रमांक असेल.
 • अशा प्रकारे ट्रॅक्टर योजनेसाठी तुमचा अर्ज पूर्ण होईल आणि तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता.
या योजना पाहिल्यात का?

> Namo Kisan Yojana: या शेतकर्‍यांना मिळणार दरवर्षी १२,००० रुपये

> गाई म्हशी गोठा अनुदान योजना 2023: असा घ्या लाभ

> महाराष्ट्र रोजगार भत्ता योजनेअंतर्गत प्रतिमहिना मिळणार 5000 रुपये

सारांश: PM Kisan Tractor Yojana 2023

प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सध्या काही राज्यांमध्येच राबविली जात आहे आणि लवकरच संपूर्ण देशातील शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

आपल्या राज्यात या योजनेचा लाभ कसा घेता येईल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली तक्ता पाहू शकता जेथे तुम्हाला अर्ज लिंक्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

राज्य वेबसाईट
महाराष्ट्र अर्ज लिंक
बिहार अर्ज लिंक
हरियाणा अर्ज लिंक
गोवा अर्ज लिंक
आसामअर्ज लिंक
मध्यप्रदेश अर्ज लिंक

तुमच्या राज्याचे नाव या यादीत नसल्यास चिंता करू नका. लवकरच PM Kisan Tractor Yojana 2023 संपूर्ण देशात राबवली जाणार आहे.

यासाठी राज्यसरकार ने काही सूचना, बातम्या जाहीर केल्यास आम्ही ते या लेखात अद्यतन करू.

शेतकरी बांधवांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन आम्ही करतो. यासंबंधी काही अडचणी, शंका असल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून विचारू शकता.

Leave a Comment