PM Kisan Yojana: १४ व्या हप्त्यासाठी हे काम करा अन्यथा पैसे अडकले जातील

PM Kisan Yojana 2023: पंतप्रधान किसान सन्मान निधीचे सदस्य असलेल्या शेतकर्‍यांना तेराव्या हप्त्याचे पैसे जारी करण्यात आले आहेत. आता शेतकरी बांधव चौदाव्या हप्त्याच्या पैशाची वाट पाहत आहेत. परंतु, शेतकर्‍यांच्या खात्याची पडताळणी न झाल्यास त्यांना १४व्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही.

शासनाने लाभार्थी शेतकर्‍यांना त्यांच्या खात्याची ई-केवायसी अपडेट करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार PM Kisan Yojana राबवत आहे. या योजनेअंतर्गत, लाभार्थी शेतकर्‍यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये ६,००० रुपये दिले जातात. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी तेरावा हप्ता म्हणून १६,८०० कोटी रुपये जारी करण्यात आले होते. तर त्यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये १ कोटी शेतकर्‍यांना बाराव्या हप्त्याची रक्कम देण्यात आली होती.

पंतप्रधान किसान योजनेचा चौदावा हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान लाभर्थ्यांना देण्यात येणार आहे. यावेळी केंद्र सरकार लवकरच ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करेल, असा अंदाज आहे. परंतु, हे स्पष्ट करण्यात आले आहे की ज्या लाभार्थ्यांची खाती पडताळली गेली नाहीत म्हणजेच KYC पूर्ण नाही त्यांना निधीचे पैसे मिळणे कठीण होईल.

त्यामुळे लाभार्थी शेतकर्‍यांनी KYC तपशील वेळेपूर्वी पूर्ण करावा. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी पूर्ण करू शकता.

पीएम किसान योजना ऑनलाईन केवायसी

 1. ऑनलाईन KYC अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम PM Kisan Yojana अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
 2. वेबसाईट च्या मुख्य पृष्ठावर तुम्हाला eKYC पर्याय दिसेल.
 3. येथे तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका आणि Captcha कोड भरल्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा.
 4. यानंतर, तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.
 5. आता नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला OTP क्रमांक टाका.
 6. अशा प्रकारे तुमच्या पीएम किसान खात्याचे eKYC ऑनलाईन पद्धतीने पूर्ण होईल.

किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना 2023: असा भरा ऑनलाईन फॉर्म

पीएम किसान योजना बायोमेट्रिक केवायसी

 • सर्वप्रथम पात्र शेतकर्‍यांनी जवळच्या CSC (कॉमन सर्विस सेंटर) वर भेट द्या.
 • यानंतर पीएम किसान खात्यात अडपेट करण्यासाठी तुमचे आधार कार्ड कर्मचार्‍याला द्या.
 • आता खात्यात लॉग इन करण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने अनुसरण करा.
 • यानंतर, आधार कार्ड क्रमांक अपडेट केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
 • अशा प्रकारे तुमची ऑफलाईन KYC पूर्ण होईल.

अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी लवकरच त्यांच्या खात्याची eKYC पूर्ण करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला चौदाव्या हप्त्याचा लाभ घेता येईल.

Leave a Comment