मोठी बातमी: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांवर होऊ शकते कारवाई, जाणून घ्या माहिती

तुम्ही पंतप्रधान किसान योजनेचा अशा प्रकारे लाभ घेत आहात का? फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो!

PM Kisan Yojana 2023: पंतप्रधान किसान योजनेचा 13 हप्ता जारी करण्यात आला असून देशातील सर्व शेतकरी बांधव आता 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांसाठी सरकारने आता कडक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. अशा शेतकऱ्यांवर सरकार कडक कारवाई करणार आहे.

मात्र, देशात आता अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत ज्यामध्ये अपात्र लोक या योजनेचा लाभ घेताना आढळून येत आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

या अपात्रांकडून पैसे वसूल केले जात आहेत

सरकार ने आता या अपात्र शेतकर्‍यांकडून पैसू वसूल करायला सुरुवात केली आहे. चुकीच्या पद्धतीने पीएम किसान योजनेचा लाभ घेणार्‍या शेतार्‍यांकडून पैसे वसूल करण्याचे काम राज्य सरकारने सुरू केले आहे. अशा शेतकऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो

कुटुंबातील एकाच जमिनीच्या आधारावर घरातील अनेक सदस्य या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेअंतर्गत मिळणारे हप्त्याचे पैसे परत करावे लागतील. पीएम किसान योजनेच्या नियमानंनुसार घरातील फक्त एकाच व्यक्तिला याचा लाभ घेता येतो.

घरातील एकाच जमिनीवर आई, वडील, मुलगा यांना योजनेअंतर्गत पैसे मिळत असतील तर ते सरकारला परत करावे लागतील. तसेच, तुम्ही हे जाणूनबुजून करत असल्याचे आढळल्यास तुमच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाही नोंदवला जाऊ शकतो.

PM Kisan Yojana: १४ व्या हप्त्यासाठी हे काम करा अन्यथा पैसे अडकले जातील

येथे संपर्क करा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. योजनेशी संबंधित कोणत्याही समस्या किंवा प्रश्न असल्यास 011-24300606 या क्रमांकावर कॉल करून आवश्यक माहिती मिळवू शकता.

याशिवाय, तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक (155261) आणि टोल फ्री (18001155266) वर देखील कॉल करू शकता.

शेतकऱ्यांना या योजनेशी संबंधित आणखी माहिती हवी असल्यास पीएम किसान लँडलाइन क्रमांक 011-23381092 किंवा 011-23382401 वर कॉल करू शकतात. किंवा pmkisan-ict@gov.in वर ईमेल पाठवू शकता.

Leave a Comment