प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2023: पात्रता, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Mudra loan yojana 2023: देशातील बेरोजगारीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी अनेक प्रयत्न करत असते. अशाच एका योजनेद्वारे शासनाने पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना (पीएम मुद्रा लोन) सुरू केली आहे.

या योजनेद्वारे लघु उद्योग, कॉर्पोरेट उद्योग तसेच कृषि उद्योगांना सरकारकडून 10 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. हा लाभ लाभर्त्यांना त्यांच्या श्रेणींनुसार PMMY अंतर्गत दिला जातो. ज्यामुळे नागरिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यास मदत होते.

जर तुम्हालाही प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावून अर्ज भरू शकता.

पीएम मुद्रा लोन योजनेसाठी पात्रता काय आहे, लाभ तसेच अर्ज कसा करावा याची सर्व माहिती आम्ही या लेखात दिली आहे. त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना माहिती 2023

केंद्र सरकारने सुरू केलेल्या PM Mudra Loan Yojana अंतर्गत देशातील तरुण उद्योजक ज्यांना स्वत:चा व्यवसाय करायचा आहे किंवा त्यांचा प्रस्थापित व्यवसाय आणखी वाढवायचा आहे त्यांना पीएम मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत समाविष्ट असलेल्या बँकांकडून कर्ज मिळणार आहे.

हे कर्ज बँकेकडून व्यक्तीच्या श्रेणीनुसार आणि त्यांच्या गरजेनुसार 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत सुलभ अटींमध्ये दिले जाते. यामुळे लोक कोणत्याही आर्थिक समस्येशिवाय त्यांचा उद्योग सुरू करण्यास सक्षम असतील.

PM Mudra Yojana Marathi योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी नागरिकांना मुद्रा कार्ड दिले जाते, या कार्डद्वारे लाभार्थ्यांना बँकेकडून अगदी सुलभ अटींमध्ये कर्ज मिळू शकते.

पीएम मुद्रा कर्ज योजनेच्या चांगल्या ऑपरेशनसाठी केंद्र सरकारने 3 लाख कोटी रुपयांचे बजेट तयार केले आहे, ज्या अंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण 1 कोटी 75 लाख रुपयांचे कर्ज प्रदान करण्यात आले आहे. त्याचबरोबर कर्जाची परतफेड करण्यासाठीचा कालावधी 5 वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे.

अटी व पात्रता

पीएम मुद्रा कर्ज योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराला त्याची विहित पात्रात पूर्ण करावी लागेल. याची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.

 • या योजनेअंतर्गत, ज्यांना स्वत:चा उद्योग सुरू करायचा आहे अशा व्यक्ति अर्ज करण्यास पात्र असतील.
 • योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमार्यादा कमीत कमी 18 वर्षे असावी.
 • अर्जदार कोणत्याही बँकेत डिफॉल्टर नसावेत, असे झाल्यास ते अर्जासाठी पात्र मानले जाणार नाहीत.
 • मुद्रा (शिशू) आणि मुद्रा (किशोर) श्रेणी अंतर्गत रु. 50,000 ते 5,00,000 पर्यंत कर्जसाठी अर्ज केला जाऊ शकतो.
 • मुद्रा (तरुण) श्रेणी अंतर्गत रु. 10,00,000 पर्यंतचे कर्ज लाभ तुम्ही घेऊ शकता.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

PM Mudra Yojana Marathi योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारकडे आवश्यक कागदपत्रे असणे महत्वाचे आहे. अशा सर्व कागदपत्रांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • ओळख पत्र (पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र)
 • पत्त्याचा पुरावा
 • जन्म प्रमाणपत्र
 • पासपोर्ट साईज फोटो
 • व्यवसायाशी संबंधित प्रमाणपत्र
 • इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न
 • स्थापनेचे प्रमाणपत्र
 • मागील तीन वर्षांचा बँक तपशील

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना अर्ज प्रक्रिया

Mudra loan yojana 2023 लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला अर्ज प्रक्रिया जाणून घेणे गरजेचे आहे. तुम्ही येथे नमूद केलेल्या स्टेप्स वाचून ऑनलाईन अर्ज भरू शकता.

 1. योजनेत अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेब पोर्टल ला भेट द्या.
 2. आता तुमच्या स्क्रीनवर वेबसाईटचे होम पेज उघडेल.
 3. येथे मुख्यपृष्ठाच्या तळाशी तुम्हाला तीन पर्याय दिसतील. (शिशू, किशोर, तरुण) तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडा.
 4. त्यानंतर Mudra Loan Yojana अर्ज फॉर्म तुमच्या स्क्रीनवर उघडेल. फॉर्म डाऊनलोड करून प्रिंटआऊट घ्या.
 5. आता तुम्हाला अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी लागेल आणि योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील.
 6. अर्ज फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर एकदा तपासा आणि तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखीत सबमिट करा.
 7. अशा प्रकारे योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर तुमच्या फॉर्मच्या पडताळणीनंतर एक महिन्यानंतर तुम्हाला कर्जाचा लाभ दिला जाईल.
या योजना पाहिल्यात का?

> महाराष्ट्र रोजगार भत्ता योजनेअंतर्गत प्रतिमहिना मिळणार 5000 रुपये

> Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 4.0: असा करा ऑनलाईन अर्ज

> Namo Kisan Yojana: या शेतकर्‍यांना मिळणार दरवर्षी १२,००० रुपये

सारांश

आम्ही या लेखाद्वारे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2023 संबधित सर्व माहिती प्रदान केली आहे. या योजनेबद्दल तुम्हाला काही शंका, प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंट करून विचारा. अशा अनेक सरकारी योजना, कृषि योजना, व्यावसायिक टिप्स साठी आमच्या वेबसाईट ला नियमित भेट द्या.

Leave a Comment