Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 4.0: असा करा ऑनलाईन अर्ज

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 4.0: देशातील वाढत्या बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार युवकांसाठी रोजगारची नवीन संधी आणि कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने अनेक योजना राबवत आहे.

अशाच एका योजनेद्वारे शासनाने देशातील कमी शिक्षित आणि बेरोजगार तरुणांना नोकर्‍या देण्यासाठी 2015 मध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू केली.

या योजनेअंतर्गत देशातील 10वी किंवा 12वी उत्तीर्ण बेरोजगार तरुणांना शासनातर्फे मोफत औद्योगिक प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून त्यांना आवड असल्येला कोणत्याही क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन उत्तम रोजगार मिळू शकेल किंवा ते स्वत:चा व्यवसाय चालू करू शकतील.

तर तरुणांनी Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 4.0 योजनेचा लाभ कसा घ्यावा, अर्ज कसे भरावे तसेच यासाठी पात्रता आणि अटी काय आहेत यासंबंधित सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

पीएम कौशल्य विकास योजना 4.0

PMKVY अंतर्गत आतापर्यंत देशातील लाखो तरुणांना तिसर्‍या टप्प्यातून प्रशिक्षित करण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना संगितले की, केंद्र सरकार लवकरच PMKVY 4.0 राबवणार आहे.

पंतप्रधान कौशल्य विकास योजना 4.0 योजनेतून देशातील लाखो तरुण वर्गाला कौशल्य प्रदान करण्याचे काम केले जाईल. यासोबतच नोकरी-व्यवसाय प्रशिक्षण, उद्योग भागीदारी आणि उद्योगाच्या गरजांनुसार अभ्यासक्रमाचे संरेखन यावरही भर दिला जाईल.

यासाठी देशभरात 30 कौशल्य केंद्रेही उघडली जातील, जिथे त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाईल.

अटी व पात्रता

 1. कौशल्य विकास योजनेसाठी अर्ज करणारे अर्जदार भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
 2. शाळा सोडलेले उमेदवार या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरत नाहीत.
 3. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 15 ते 45 वर्षे दरम्यान असले पाहिजे.
 4. उमेदवारला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 5. जे उमेदवार बेरोजगार आहेत आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नाही PMKVY 4.0 साठी पात्र असतील.
 6. अर्जासाठी उमेदवाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे जे आधार कार्डशी जोडलेले असावे.

पीएम कौशल्य विकास योजणेसाठी आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत अर्जासाठी तुमच्याकडे सर्व महत्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे. याशिवाय अर्जाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे.

 • ओळखपत्र (मतदान कार्ड, पॅन कार्ड)
 • शाळेचे प्रमाणपत्र
 • बँक खाते क्रमांक
 • पासपोर्ट साईज फोटो
 • मोबाईल नंबर
 • ईमेल आयडी

PMKVY ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 2023

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते येथे नमूद केलेल्या सोप्या पायर्‍या वाचून योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

 • PMKVY अर्जासाठी, प्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
 • येथे होम पेज वर तुम्हाला Quick Links चा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा.
 • आता तुमच्या स्क्रीन वर MSDE, NSDC, SKILL INDIA, UDAAN असे चार पर्याय दिसतील. PMKVY 4.0 अर्जासाठी SKILL INDIA या पर्यायावर क्लिक करा.
 • यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल जेथे तुम्हाला I want to skill myself असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
 • आता उमेदवार नोंदणी फॉर्म तुमच्या स्क्रीनवर उघडेल जेथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव, जन्मतारीख, ईमेल पत्ता, मोबाईल नंबर द्यावा लागेल.
 • सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.
या योजना पाहिल्यात का?

> महाराष्ट्र रोजगार भत्ता योजनेअंतर्गत प्रतिमहिना मिळणार 5000 रुपये

> Namo Kisan Yojana: या शेतकर्‍यांना मिळणार दरवर्षी १२,००० रुपये

सारांश

आजच्या लेखाद्वारे आम्ही प्रधानमंत्री विकास कौशल्य 4.0 योजनेसंबंधित सर्व माहिती दिली आहे आणि आम्हाला आशा आहे की ही माहिती तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल.

PMKVY योजनेबद्दल तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर आम्हाला खाली कमेंट करून कळवा. अशा अनेक विविध सरकारी योजनांच्या महितीसाठी आमच्या वेबसाईट ला सतत भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला उपयुक्त माहिती मिळत राहील.

Leave a Comment