Reliance Industries Share Price: रिलायन्सचे मार्केट कॅप 18 लाख कोटी रुपयांच्या पुढे, शेअर्सने गाठला 52 आठवड्यांचा उच्चांक

Reliance Industries Limited Stock: रिलायन्स कंपनीच्या शेअर्स मध्ये तेजीत वाढ होत असल्याने कंपनीचे मार्केट कॅप 18 लाख कोटींच्या पुढे गेले आहे.

Reliance Industries Share Price Today: आज (10 जुलै) रोजी शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर मध्ये 4.5 टक्के वाढ झाली असून Share price 2,775 रुपयांवर पोहोचली आहे. 52 आठवड्यांची ही सर्वोच्च शेअर्स पातळी आहे. रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्सच्या विलगीकरणासाठी कंपनीने 20 जुलै ही रेकाॅर्ड तारीख निश्चित केली आहे. तसेच, या कंपनीचे नाव बदलून Jio Financial Services (JFSL) करण्यात येणार आहे. Reliance Industries चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या या घोषणेनंतर आज कंपनीचा शेअर्स मोठ्या तेजीने उघडला.

देशातील पाचवी सर्वात मोठी वित्त कंपनी

दिनांक 20 जुलै रोजी Reliance Industries Group या कंपनीचे इक्विटी भागधारक निश्चित करेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे (RSIL) नवीन इक्विटी शेअर्स मिळतील. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत Jio Financial Services (JFSL) लिस्ट करण्याची योजना कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आखत आहेत.

जेफरीजच्या दाव्यानुसार, JFSL चे मार्केट व्हॅल्यूएशन 90,000 ते 1.5 लाख कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. भांडवलाच्या बाबतीत ही कंपनी भारतातील पाचवी सर्वात मोठी वित्त कंपनी असेल आणि Paytm आणि Bajaj Finance कंपनीशी थेट स्पर्धा करेल.

लिस्टींग आणि वाटप कधी होईल?

रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर्स (Reliance Industries Share Price) 12.30 वाजता 112 रुपय उच्चांक वाढीसह 2746 रुपयांवर व्यवहार करत आहे. जेपी मॉर्गन आणि काही इतर नामांकित ब्रोकरेज फर्म्सच्या मते JFSL कंपनीचा शेअर 157 ते 190 रुपयांपर्यंत असू शकतो. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जुलै किंवा ऑगस्टमध्ये लिस्टींग आणि वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर होण्याचा अंदाज आहे. कंपनीने अजूनही एजीएमची तारीख निच्छित केलेली नाही.

रिटेल इक्विटीचे भांडवल मात्र कमी

याच दरम्यान रिलायन्सची रिटेल कंपनी Reliance Retail Ltd कंपनीचे भागभांडवल कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 1362 रुपये दराने शेअर्स रद्द केले जातील. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सकडे रिलायन्स रिटेलमध्ये 99.91 टक्के शेअर्स आहेत तर 0.09 टक्के शेअर्स इतर गुंतवणूकदारांकडे आहेत.

शेअर्सवर ब्रोकरेज फर्मचे मत जाणून घ्या

जेपी मॉर्गनने रिलायन्सच्या शेअर्सवर 2,960 रुपये लक्ष्य किंमत ठेवली आहे. शुक्रवारी रिलायन्सचा शेअर 0.11 टक्क्यांनी घसरून 2635.45 रुपयांवर बंद झाला. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की कंपनीने आपली व्यावसायिक रणनीती आणि लक्ष्ये जाहीर करताच रिलायन्सच्या शेअर्सचे मूल्य वाढू शकते. डिमर्जर आणि लिस्टिंगपूर्वी रिलायन्सचे शेअर्स फोकसमध्ये राहतील. कारण रिलायन्सच्या भागधारकांना प्रत्येक शेअरमागे जिओ फायनान्शियलचा एक हिस्सा मिळेल. रिलायन्सचे शेअर्स गेल्या तीन महिन्यांत 13 टक्क्यांनी वधारले आहेत.

अधिक वाचा:

Leave a Comment