जेष्ठ नागरिक बचत योजना 2023: दर महिना मिळणार 20,000 रुपये

Senior Citizen Saving Scheme 2023: जेष्ठ नागरिक बचत योजना ही भारत सरकारने वृद्धांसाठी सुरू केलेली एक सर्वोत्तम बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत, लाभर्थ्यांना सर्वाधिक व्याज दर दिला जातो तसेच जास्तीत जास्त कर सूटही दिली जाते. SCSS योजना सरकारी असल्याने यामध्ये नागरिकांचे पैसे बुडण्याचा धोका नाही.

1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने जेष्ठ नागरिक बचत योजनेतील ठेवींची कलाम मर्यादा 30 लाख रुपये इतकी केली आहे. जर तुम्ही वृद्ध नागरिक असाल आणि तुमचे पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर जेष्ठ नागरिक बचत योजना 2023 तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

या लेखाद्वारे आम्ही Senior Citizen Saving Scheme (SCSS) बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.

जेष्ठ नागरिक बचत योजनेचे फायदे

 • जेष्ठ नागरिकांना या योजनेत गुंतवणूक करून सर्वात सुरक्षित आणि विश्वासू गुंतवणूक पर्याय मिळतो.
 • SCSS योजनेअंतर्गत तुम्ही किमान 1000 रुपयांचे खाते उघडू शकता.
 • या योजनेत 60 वर्षांचे कोणतेही नागरिक गुंतवणूक करू शकतात.
 • गुंतवता येणारी कमाल ठेव रक्कम 30 लाख रुपये इतकी असेल.’
 • 5 वर्षे पूर्ण झाल्यावर, जमा केलेली रक्कम परत केली जाते.
 • जेष्ठ नागरिक बचत योजनेत 8% व्याजदराचा लाभ मिळतो जे इतर गुंतवणूकीच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
 • या योजनेत दर तीन महिन्यांनी तुम्हाला व्याजाच्या रकमेचा लाभ मिळत राहील.
 • आयकर विभागाच्या कलम 80-सी अंतर्गत, SCSS योजनेत गुंतवणूक करण्यासाठी नागरिकांना 1.5 लाख रुपये कर सवलतीचा लाभ दिला जातो.
 • भारताच्या कोणत्याही अधिकृत बँकेच्या पोस्ट ऑफिस मध्ये ज्येष्ठ नागरिक बचत खाते उघडले जाऊ शकते.

Namo Kisan Yojana: या शेतकर्‍यांना मिळणार दरवर्षी १२,००० रुपये

जेष्ठ नागरिक बचत योजनेसाठी पात्रता

 1. भारतातील कोणतेही ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 2. यासाठी वयोमार्यादा 60 वर्ष इतकी आहे. सेवानिवृत्त किंवा VRS घेणारे कर्मचारी वयाच्या 50 व्या वर्षी SCSS खाते उघडण्यास पात्र ठरतील.
 3. या खात्यामध्ये जोडीदारासह संयुक्त खाते उघडण्याची परवानगी आहे.
 4. संयुक्त खाते उघडण्यासाठी किमान वयाची अट फक्त मुख्य खातेदाराला लागू होते.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 1. ओळखपत्र
 2. पत्त्याचा पुरावा
 3. वय प्रमाणपत्र
 4. पासपोर्ट आकाराचा फोटो
 5. मोबाईल नंबर
 6. ईमेल आयडी

किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना 2023: असा भरा ऑनलाईन फॉर्म

ज्येष्ठ नागरिक बचत खाते उघडण्याची प्रक्रिया

 • ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये भेट द्या.
 • तिथे जाऊन ज्येष्ठ नागरिक योजनेचा अर्ज फॉर्म मिळवा.
 • अर्ज प्राप्त केल्यानंतर, फॉर्ममध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करा.
 • आता आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडून अर्ज बँकेत किंवा पोस्टात सबमीट करा.

अशा प्रकारे तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत खाते 2023 योजनेअंतर्गत उघडू शकता आणि लाभ घेऊ शकता. सरकारी योजना, कृषि माहिती आणि व्यवसाय टिप्स साठी SmartUdyojak वेबसाईट ला भेट देत रहा.

Leave a Comment