मोठी बातमी: ‘शासकीय योजनांची जत्रा’ उपक्रम राज्यभर

राज्यशासनाच्या माध्यमातून ‘शासकीय योजनांची जत्रा‘ हा एक नवीन उपक्रम राज्यभर राबवला जाणार आहे. राज्यातील 37 योजना ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तिपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत आणि त्यांचा संपूर्ण लाभ लोकांना मिळाला पाहिजे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार आहे.

स्‍वातंत्र्यांच्‍या अमृतमहोत्‍सवी वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यांच्या माध्यमातून एकाच दिवशी ७५ हजार लाभार्त्यांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे.

कमीत कमी कागदपत्रे आणि शासनाच्या योजनांचा जलद लाभ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यासरकाने मोठे पाऊल उचलले आहे. गोरगरीब जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे आणि दिलासा मिळणार आहे.

याबद्दल संपूर्ण माहीत आपण या लेखात जाणून घेणार आहोत त्यामुळे लेख पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल.

‘शासकीय योजनांची जत्रा’ उपक्रम काय आहे?

सामान्य जनतेला विविध शासन योजनांची माहिती, अर्ज कुठे आणि कसा करावा, याचा लाभ कसा मिळतो तसेच त्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे यांची माहिती नसते. त्यामुळे ग्रामीण भागात अनेकजण या योजनांपासून वंचित राहतात.

या सगळ्या गोष्टींचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी सरकारी योजना गतिमान करून राज्यातील प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहचल्या पाहिजेत या दृष्टीकोणातून शासकीय योजनांची जत्रा 2023 उपक्रम राज्यभर सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर आणि सातारा जिल्ह्यात हा उपक्रम प्रथम राबविण्यात येणार आहे. राज्यातील एकूण 75 शासकीय योजनांची माहिती व लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 75,000 लाभर्त्यांना याचा फायदा होणार आहे.

या उपक्रमामध्ये पुढे आणखी योजनांचा समावेश करण्यात येणार आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व विभागांनी उपलब्ध योजना, शासकीय निर्णय याबद्दल पूर्वतयारी करावी अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या गेल्या आहेत. मे महिन्यामध्ये याला सुरुवात होईल अशी आशा आहे.

उपक्रमाचे स्वरूप

  • लाभार्थीना कमीत कमी कागदपत्रामध्ये आणि जलद गतीने या योजनेचा लाभ दिला जाणार असून तीन दिवस विविध विभागाचे कर्मचारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे अधिकार्‍यांना थेट जनतेशी संवाद साधता येणार आहे.
  • शासकीय योजनांची सर्व माहिती देणे, आवश्यक लागणारी कागदपत्रे याबद्दल सविस्तर माहिती जनतेला या जत्रेद्वारे दिली जाईल.
  • योजनांसाठी पात्र लाभार्थीना शिंदे यांच्याकडून लाभाबाबतचे प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेतला जाईल.
  • या जत्रेमुळे जनतेच्या खर्‍या समस्या पुढे येतील जेणेकरून त्यावर योग्य ते निर्णय आणि उपाययोजना यांची खबरदारी घेतली जाईल.

तर तुम्हाला ‘शासकीय योजनांची जत्रा‘ हा उपक्रम कसा वाटला आणि तुमची याबद्दलची प्रतिक्रिया आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

Leave a Comment