Sukanya Yojana 2023: सुकन्या समृद्धी योजना लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी भेट

Sukanya Yojana 2023: देशातील मुलींचा दर्जा उंचावण्याच्या आणि सुधारण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकार विविध बचत योजना सुरू करून मुलींना लाभ देते. अशाच एका बचत योजनेद्वारे पालकांना त्यांच्या मुलींसाठी पैसे वाचवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

भविष्यासाठी बचत करण्याची सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजना 2023 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे पालक बँकेत किंवा कार्यालयात खाते उघडू शकतील आणि भविष्यात तिच्या उच्च शिक्षण आणि अभ्यासासाठी बचत करू शकतील.

Sukanya Samruddhi Yojana अंतर्गत खाते उघडल्यावर लाभार्थी मुलीला सरकारकडून 7.6% व्याज दिले जाईल. ज्याचा लाभ मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर तिला मिळू शकेल.

आजच्या लेखात सुकन्या समृद्धी योजना काय आहे, तसेच या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्ज प्रक्रिया या संदर्भात संपूर्ण माहिती आम्ही दिली आहे.

सुकन्या समृद्धी योजना 2023

सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारने 2015 मध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोहिमेचा एक भाग म्हणून सुरू केली केलेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पालकांना बचतीची सुविधा सरकार उपलब्ध करून देते.

सुकन्या समृद्धी योजना 2023 अंतर्गत, 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे खाते उघडले जावू शकते. खाते उघडण्यासाठी किमान रक्कम 250 रुपये आणि कमाल रक्कम 1.5 लाख रुपये आहे ज्यामध्ये अर्जदार मुलीच्या खात्यात पैसे जमा करू शकतात.

आपल्या सोयीनुसार खाते उघडल्याच्या तारखेपासून 14 वर्षांपर्यंत खात्यात पैसे जमा करावे लागतील. त्यानंतर, मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर तिला खात्यावरील एकरकमी रक्कम काढता येईल. जरी मुलगी 18 वर्षांची असली तरी तिला 50% पैसे काढता येतील.

पीएम सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये

 • सुकन्या समृद्धी योजना 2023 माध्यमातून नागरिक त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी पैसे जमा करू शकतील.
 • एकाच कुटुंबातील दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
 • तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावून या योजनेसाठी खाते उघडू शकता.
 • या योजनेतील अर्जावर सरकारकडून 7.6% व्याज दिले जाईल.
 • आयकर कलाम 80-सी अंतर्गत सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यास कर सवलतीचा लाभ मिळेल.
 • या योजनेमध्ये खाते उघडल्यापासून 14 वर्षे नियमितपणे गुंतवणूक करावी लागेल.
 • योजनेअंतर्गत, अर्जदार मुलगी तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा गरजेसाठी 18 वर्षांची झाल्यानंतर 50% टक्के रक्कम तसेच 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकरकमी रक्कम काढू शकेल.
 • सुकन्या समृद्धी योजना 2023 नागरिकांना त्यांच्या मुलीच्या लग्नाचा आणि उच्च शिक्षणाचा खर्च आणि गरजा कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय भागवता येतील.

SSY योजनेअंतर्गत नवीन बदल

केंद्र सरकारच्या वतीने Sukanya Samrudhi Yojana 2023 मध्ये पाच नवीन बदल करण्यात आले आहेत, त्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

 1. योजनेअंतर्गत अर्जदाराने नियमितपणे एका वर्षात खात्यात किमान 250 रुपये जमा करणे बंधनकारक आहे. ही रक्कम लाभार्थ्याने जमा न केल्यास त्याचे खाते डिफॉल्ट मानले जाईल.
 2. नवीन नियमांनुसार, जरी SSY खाते पुन्हा सक्रिय झाले नाही तर मुलीच्या परिपक्वेतेपर्यंत तुम्हाला डिफॉल्ट खात्यावर 7.6% व्याजदर मिळत राहील.
 3. या योजनेअंतर्गत दोन मुलीचे खाते उघडता येते व योजनेचा लाभ घेता येतो.
 4. नवीन नियमांनुसार मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत खाते स्वत: चालवू शकत नाही.
 5. खात्यातील चुकीच्या व्याजाचा परतावा देण्याची तरतूद बदलण्यात आली आहे, तसेच खात्याचे वार्षिक व्याज प्रत्येक वर्षाच्या शेवटी जमा केले जाईल.

अटी व पात्रता

सुकन्या समृद्धी योजना 2023 लाभ मिळवण्यासाठी, अर्जदाराने त्याची विहित पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतरच योजनेतील अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

 • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारताचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • नवजात ते 10 वर्षांपर्यंतची मुलगी अर्जासाठी पात्र असेल.
 • एका कुटुंबातील फक्त दोन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 1. मुलीचे जन्म प्रमाणपत्र
 2. पालकांचा आयडी पुरावा
 3. रहिवासी प्रमाणपत्र
Lek Ladki Yojana: महाराष्ट्राची नवीन ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत मिळणार 98,000 रुपये

सारांश

आजच्या लेखाद्वारे आम्ही पीएम सुकन्या किसान समृद्धि योजना 2023 संबंधित सर्व माहिती दिली आहे आणि आम्हाला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

शासनाच्या अश्या विविध योजनांच्या महितीसाठी SmartUdyojak वेबसाईट ला भेट देत रहा. तसेच तुम्ही आमचा whatsapp group सुद्धा जॉईन करू शकता.

या योजनेसंबंधित काही प्रश्न, शंका असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता.

Leave a Comment