Cotton Rate: शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर, कापूस बाजारभाव वाढला

कापूस बाजारभाव: मागील काही महीने कापसाचे दर कोसळले होते पण पुन्हा एकदा कापसाला बाजारात सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे.

कापूस बाजारभाव चढ उतारामुळे अनेक कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत होते. सरकारनेही याकडे खास लक्ष दिलेल नाही हे स्पष्ट दिसत आहे. कापसाला योग्य भाव मिळेल या आशेने बळीराजा वाट पाहत होता आणि याच परिस्थितीचा फायदा घेऊन व्यापर्‍यांनाही चांगलाच माज चढला होता.

अनेक दिवसांपासून कापूस जमा करून ठेवलेल्या शेतकर्‍यांची चिंता अजून वाढली होती. योग्य भाव नाही मिळालं तर काय करायच हा मोठा प्रश्न होता. पाऊस 2 महिन्यांवर येऊन ठेपला आहे आणि आता आता सर्व माल काय करायचं या भीतीने बळीराजा चिंतेत होता.

पण आता कापूस बाजारभाव चांगलाच उंचावला आहे आणि शेतार्‍यांमध्येही खुशीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पाहा आजचा कापूस बाजारभाव कोणत्या राज्यात किती

बाजारात कापसाची मागणी वाढली आहे. नागपूर जिल्ह्यात आज कापसाला 1130 क्विंटल आवक मिळाली. वर्ध्यात कापसाला 8300 रुपये सर्वाधिक भाव मिळाला. कापसाचा सरासरी भाव 7300 रुपये प्रतिक्विंटल इतका आहे.

मात्र उमरेड, किनवट, भद्रावती, काटोल, पारशिवनी येथे कापूस बाजारभाव 8000 रुपये क्विंटलच्या आसपास होता. बाजारात कापसाला चढ उतार चालू आहे तरी आता चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदात आहेत.

Wheat Rate Today: अवकाळी पावसाच्या इशार्‍याने गहू बाजारभाव घसरण्याची भीती

आता जास्त भाववाढीची अपेक्षा नकोच

बाजारात सध्या चढ उतार पाहायला मिळत आहेत. कांदा बाजारभाव, सोयाबीन बाजारभाव, हरभरा बाजारभाव अनेक समित्यांमध्ये कमी जास्त पाहायला मिळतोय. मागील वर्षाच्या तुलनेत स्थिरता पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

शेतकरी बांधवांनी जास्त वाट न बघता दरवाढीचा त्याचा लाभ घ्यावा, जास्त भाववाढीची अपेक्षा नकोच.

Leave a Comment