Ration Card: लाखो लोकांचं रेशनकार्ड होणार रद्द, सरकारचा मोठा निर्णय

Ration Card Update: देशातील लाखो रेशनकार्ड धारकांचे रेशनकार्ड लवकरच रद्द केले जाणार आहेत. याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेऊन लाभर्थ्यांना मोफत धान्य मिळणार नाही. 10 लाखाहून अधिक लाभार्थ्यांचा या यादीत समावेश असल्याची माहिती सरकारने दिली आहे.

कोरोनाच्या महामारीत शासनाने मोफत धान्य रेशन योजना सुरू केली होती. याअंतर्गत देशातील 80 कोटींहून अधिक कुटुंबीयांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये तांदूळ, चणाडाळ, गहू अश्या विविध धान्यांचा समावेश आहे.

मात्र आता सरकारच्या नवीन नियमांनुसार अपात्र रेशनकार्ड धारकांना याचा लाभ घेता येणार नाही.

यासंबंधित अपात्र रेशनकार्ड धारकांची यादी अधिकृत रेशनकार्ड वाटप केंद्रावर पाठवली जाणार आहे. त्यानंतर अश्या लोकांना रेशन मिळणे बंद होईल. याबद्दलची सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवली जाणार आहे आणि त्यानंतर ही यादी जाहीर केली जाणार आहे.

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांवर होऊ शकते कारवाई, जाणून घ्या माहिती

टॅक्स भरताय तर रेशन नाही

NFSA (राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम) नुसार जे नागरिक आयकर भरत आहेत तसेच 10 बिघा पेक्षा अधिक जमीन नावावर आहे त्यांना मोफत रेशनाचा लाभ घेता येणार नाही. त्याचप्रमणे जर तुम्ही मिळालेलं धान्य बाहेर विकत असल्याचे आढळून आल्यास तुमचे रेशन कार्ड देखील रद्द केले जाऊ शकते.

Leave a Comment