जाणून घ्या: भारतात सर्वाधिक मागणी असलेल्या टॉप 10 गाई

Top 10 cow breeds in India: आपल्या देशात हजारो वर्षांपासून गायींचे पालन केले जात आहे. भारतात गाईला मातेचा दर्जा दिला जातो. आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर भारतात गायींच्या 50 हून अधिक प्रजाती आढळतात.

व्यावसायिक नफा मिळवण्यासाठी गाय पालन करायचे असेल तर केवळ चांगल्या जातीच्या गायींची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. जास्त दूध देणार्‍या गायींपासून तुम्हाला चांगला फायदा होईल. रोजगाराच्या दृष्टीकोनातून पाहिले तर चांगल्या जातीच्या गायीच्या दुधाशिवाय गोमूत्र आणि शेणही शेतकर्‍यांना चांगला नफा देतात.

गाय पालन व्यवसायात एकीकडे गोमूत्र हे औषधी आणि किटनाशक म्हणून चांगले काम करते तसेच गायीचे शेण नैसर्गिक खत, मूर्ति आणि कंद तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामुळे बचत तर होतेच त्याचबरोबर अतिरिक्त उत्पन्नही मिळते.

चला तर मग आजच्या या लेखात आपण भारतातील जास्तीत जास्त दूध देणार्‍या तसेच सर्वाधिक मागणी असलेल्या टॉप 10 गायींबद्दल माहिती जाणून घेऊ.

भारतात सर्वाधिक मागणी असलेल्या टॉप 10 गाई

1. साहिवाल गाय

भारतातील देशी आणि दुभत्या गायींबद्दल बोलायचे झाल्यास, लाल रंगाच्या साहिवाल जातीचे नाव अग्रस्थानी येते. रुंद डोक्याची साहिवाल गाय ही पशुपालकांची पहिली पसंद आहे. ही गाय भारताच्या उत्तर पश्चिमी परदेशात – उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेशामध्ये खूप प्रसिद्ध आहे.

एका दिवसात 10 ते 20 लिटर दूध साहिवाल गाय देते. आणि वर्षभरात जवळजवळ 2000-3000 लिटर दूध ही गाय देते ज्यामध्ये फॅट आणि इतर पोषक तत्वांचे प्रमाण आढळते.

भारताप्रमाणे पाकिस्तानातही या गाईला खूप प्रसिद्धी आहे.

2. गीर गाय

गीर गाईला भारतातच नाही तर ब्राझील आणि इस्त्रायल सारख्या देशांमध्येही मोठी मागणी आहे. गीर गाईचे नाव तिला गुजरातच्या गीर जंगलावरून पडले आहे. भारतातील सर्वात दुधाळ गाय म्हणून या गाईची ओळख आहे. दिवसाला 80 लिटर आणि वर्षभरात 2600 लिटर दूध गीर गाय देते.

3. लाल सिंधी गाय

चांगले दूध उत्पादन आणि देखभाल करण्याच्या बाबतीत लाल सिंधी गाईचे नाव देखील समाविष्ट आहे. वर्षभरात 1800 ते 2200 लिटर दूध ही गाय देते. लाल सिंधी गाय पंजाब, हरियाणा, राजस्थान, केरळ, कर्नाटक अश्या अनेक राज्यांत पाहायला मिळते.

लाल सिंधी गाईमध्ये रोगांची लढण्याची अद्भुत क्षमता असते.

4. हरियाणवी गाय

नावाप्रमाणेच हरियाणवी गाय उंच आणि धडधाकट असते. नेहमी डोके उंच करून चालणारी हरयाणवी गाय एका दिवसात 8 ते 12 लिटर दूध देते. त्यातून वर्षभरात सुमारे 2200-2600 लिटर दूध मिळते. हरियाणवी गाय हरियाणातील रोहतक, हिस्सार, सिरसा आणि कर्नाल मध्ये आढळून येते.

चांगल्या दुग्धोत्पादनासाठी या गाईचे पालन केले जाते. उंच, धडधाकट शरीरामुळे या जातीचे बैल (नर जात) ही शेतीसाठी उपयुक्त ठरतात.

5. थारपारकर गाय

थारपारकर गाईची जात खूप दुधाळ असते. ही गाय प्रामुख्याने पाकिस्तानमधील बिकानेर, जोधपुर आणि सिंध या वाळवंटी भागात पाहायला मिळते. त्यामुळे या गाईची उष्णता सहनशक्ती खूप जास्त असते.

एका दिवसात 10-16 लिटर तर वर्षभरात 1800 ते 2000 लिटर दूध ही थारपारकर गाय देते.

Cow Farming Business: गाय पालन करून महिन्याला लाखो कमवा

6. राठी गाय

मिश्र जातीची ही राठी गाय मुख्यत: राजस्थानच्या बिकानेर आणि श्रीगंगानगरमध्ये आढळून येते. एका दिवसात 10 ते 20 लिटर दूध ही गाय देते. या गाईचे खास वैशिष्टे म्हणजे ती कोणत्याही हवामानाशी जुळवून घेते आणि कमी खाते.

राठी गाय वर्षात जवळजवळ 1800 लिटर दूध देते. या जातीचे बैल ही खूप प्रसिद्ध आहेत.

7. कंकराज गाय

कंकराज गाय मुख्यत: राजस्थान आणि गुजरात च्या काही भागांमध्ये आढळून येते. एका दिवसाला 10 लिटर तर वर्षभरात 2000 लिटर दूध ही गाय देते. विदेशात या गाईला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

8. हल्लीकर गाय

हल्लीकर गाय महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात खूप प्रसिद्ध आहे. या जातीच्या गाई चांगल्या प्रमाणात दूध देतात. त्यांच्या दुधामध्ये 4.2% फॅट असतात. एका बछडयानंतर या गाई 240 ते 515 लिटर दूध द्यायला सुरुवात करतात.

9. दज्जल गाय

दज्जल जातीच्या गाईला भगणारी असेही म्हटले जाते. पंजाबमधील ‘दरोगाजी खान’ या जिल्ह्यात या गायीचे मोठ्या प्रमाणात पालन केले जाते. दूध उत्पादनासाठी या गाईचा खूप मोठा वापर होतो.

या गाईच्या देखभालीसाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत.

10. नागोरी गाय

नागौरी जातीच्या गाईचे मूळ राजयस्थानमधील नागौरी येथे आहे. या जातीच्या बैलांच्या वहन क्षमतेमुळे त्यांना परदेशात मोठी मागणी आहे. नागोरी गाय एका बछडयानंतर 600 ते 954 लिटर दूध देते ज्यामध्ये 4.9% फॅट असतात.

जनावरांचे कृत्रिम रेतन कसे करावे: जाणून घ्या संपूर्ण माहिती

सारांश

तुम्हाला आता गायींबद्दल चांगली माहिती आली असेल अशी आम्हाला खात्री आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या शेतकरी बांधावांना ही माहिती शेअर करायला विसरू नका.

तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट करून कळवा. तसेच पशुपालन, शेती, उद्योग संबंधित महितीसाठी आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये नक्की सामील व्हा.

Leave a Comment