Wheat Rate Today: अवकाळी पावसाच्या इशार्‍याने गहू बाजारभाव घसरण्याची भीती

Wheat Rate Today: बाजारात सध्या अनेक समित्यांमध्ये गव्हाची आवक वाढताना दिसत आहे. परंतु, एकीकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने बाजारभाव घसरण्याचा अंदाज आहे.

अवकाळी पावसाचा इशारा आणि बाजारभाव घसरण्याच्या भीतीने अनेक बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे.

सध्या बाजारात किमान 2200 क्विंटल आवक दराने गहू विकला जात आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत 90,000 क्विंटल आवक बाजारात होताना दिसत आहे. गव्हाशिवाय, मका, सूर्यफूल, मिरची अशा अनेक पिकांचीही आवक वाढल्याने सगळे शेतकरी बांधव खुश आहेत.

Hydroponic Farming: मातीशिवाय शेती करण्याची आधुनिक पद्धत, जाणून घ्या!

अनेक जिल्ह्यांमध्ये गव्हाचे क्षेत्र यंदा चांगलेच वाढले आहे. सरासरीच्या तुलनेत 10 टक्के अधिक क्षेत्रवाढ यावर्षी झाली आहे. परंतु मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गव्हाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने येत्या आठवड्याचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांची गहू विक्रीसाठी धावपळ होताना दिसून येत आहे.

बाजार समितीत गव्हाची प्रचंड आवक दिसून येत आहे परिणामी भाव देखील क्विंटलमागे 100-150 रुपयांनी घसरले आहेत. सरासरी 2500 क्विंटल आवक नंदुरबार बाजार समितीत दररोज होत आहे. तसेच, शरबती, लोकवन, ग्रीनगोल्ड वाणाची आवक सध्या मोठी आहे असे चित्र बाजारात दिसून येत आहे.

Leave a Comment